
सराव सामन्याद्वारे तयारीची चाचणी घेणार
लंडन ः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल ११ जूनपासून लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल. या जेतेपदाच्या सामन्याच्या तयारीच्या दृष्टीने, दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांचा सामना खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने या वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता जिथे त्यांनी दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय मिळवला होता. दुसरीकडे, झिम्बाब्वेने अलीकडेच २२ वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता जिथे त्यांना एक डाव आणि ४५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. सिकंदर रझा, ब्लेसिंग मुजरबानी आणि रिचर्ड नगारावा संघात उपस्थित नाहीत.
झिम्बाब्वेने एक मजबूत संघ मैदानात उतरवला आहे. त्यामध्ये शॉन विल्यम्स, बेनेट, व्हिक्टर न्याउची, क्लाईव्ह मदंडे आणि क्रेग एर्विन यांचा समावेश आहे. सराव सामन्यानंतर, झिम्बाब्वे संघ २८ जूनपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल. दोन्ही संघांनी शेवटची रेड बॉल फॉरमॅटमध्ये कसोटी मालिका डिसेंबर २०१७ मध्ये खेळली होती जिथे दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि १२० धावांनी विजय मिळवता आला. एकूणच, दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्ध नऊ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी आठ जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुस्वामी.
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, तनाका चिवांगा, बेन कुरन, ॲलेक्स फालाओ, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधेवेरे, तनुनुरवा माकोनी, वेलिंग्टन मसाकादझा, व्हिन्सेंट मासेकेसा, न्यूमन न्याम्हुरी, व्हिक्टर न्याउचोलासी, विल्यम निझुच्वान, तफालसी, विल्यम न्याउचोसी.