अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार बुधवारपासून रंगणार

  • By admin
  • June 3, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love
  • अभिनेत्री चित्रांगदा सिंग उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण
  • क्रिकेट चाहत्यांना मोफत प्रवेश : रोहित पवार

पुणे : क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचा थरार बुधवारपासून (४ जून) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर रंगणार आहे. अदानी समूहाचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेट शौकिनांना टी २० क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) स्पर्धेला ५ जूनपासून प्रारंभ होणार असून एमपीएल आणि डब्लूएमपीएल या दोन्ही स्पर्धांचा शानदार उद्घाटन समारंभ बुधवारी (४ जून) सायंकाळी प्रेक्षकांची मने जिंकणार आहेत. लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची उपस्थिती आणि नेत्रदीपक ड्रोन शो उद्घाटन समारंभाची खास आकर्षणे ठरणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांमधील नामवंत व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की,“सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींना या उच्च दर्जाच्या भरपूर आनंद घेता यावा याकरिता सर्व प्रेक्षकांना सर्व सामन्यांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहे. तसेच, प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.’

रोहित पवार पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील गुणवान व उदयोन्मुख क्रिकेटपटूंना पाठिंबा व प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत. या सर्व सामन्यांचे स्टार स्पोर्ट्स २ या वाहिनावरून तसेच जियो सिनेमा वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने पुण्याबाहेरील प्रेक्षकांना ही या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे..

बुधवारी सलामीच्या लढतीत रत्नागिरी जेट्स विरुद्ध इगल नाशिक टायटन्स यांच्यात लढत रंगणार असून त्यामुळे या स्पर्धेचा रंगतदार प्रारंभ होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *