< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); विजेत्या आरसीबी संघावर पैशांचा पाऊस  – Sport Splus

विजेत्या आरसीबी संघावर पैशांचा पाऊस 

  • By admin
  • June 4, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

साई सुदर्शन ऑरेंज कॅप तर प्रसिद्ध कृष्ण पर्पल कॅपचा मानकरी 

अहमदाबाद ः आयपीएलचा १८ वा हंगाम आरसीबी संघाने जिंकून एक नवा इतिहास लिहिला. पंजाब किंग्ज संघाला दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या आरसीबी संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. तसेच खेळाडूंवरही पैशांचा  पाऊस पडला असून १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने आलिशान कार पटकावली आहे. 

पंजाब किंग्ज संघाविरुद्धचा रोमहर्षक अंतिम सामना आरसीबी संघाने अवघ्या सहा धावांनी जिंकला. या विजयासह विराट कोहलीचे १८ वर्षांपासून विजेतेपद मिळवण्याचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. 

विजेत्या संघावर पैशांचा पाऊस 
प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळी विजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले. त्याच वेळी, उपविजेत्या पंजाब किंग्जला १२.५ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली. पंजाबच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफलाही उपविजेत्या शिल्ड आणि आयपीएल मर्यादित आवृत्तीचे घड्याळ मिळाले.

आयपीएलमध्ये खर्च केलेल्या रकमेमुळे लीग नेहमीच चर्चेत असते. संघांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, इतर अनेक पुरस्कार देखील दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअर प्ले अवॉर्ड असे पुरस्कार समाविष्ट आहेत. 

स्टेज टीमची रक्कम मिळाली

चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २० कोटी रुपये

उपविजेता पंजाब किंग्ज १२.५ कोटी रुपये 

पारितोषिक विजेते खेळाडू 

सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा (१ लाख रुपये)फँटसी किंग ऑफ द मॅच – शशांक सिंग (१ लाख रुपये)
सुपर सिक्स ऑफ द मॅच – शशांक सिंग (१ लाख रुपये)
ऑन द गो मॅच ४ एस – प्रियांश आर्य (१ लाख रुपये)
ग्रीन डॉट बॉल्स ऑफ द मॅच – कृणाल पंड्या (१ लाख रुपये)सामनावीर – कृणाल पंड्या (५ लाख रुपये)उदयोन्मुख खेळाडू – साई सुदर्शन (१० लाख रुपये)सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – वैभव सूर्यवंशी (टाटा कर्व्ह)
फँटसी किंग ऑफ द सीझन – साई सुदर्शन (१० लाख रुपये)
सुपर सिक्सेस ऑफ द सीझन – निकोलस पूरन (१० लाख रुपये)
ऑन द गो सीझन ४ एस – साई सुदर्शन (१० लाख रुपये)
ग्रीन डॉट बॉल्स ऑफ द सीझन – मोहम्मद सिराज (१० लाख रुपये)
कॅच ऑफ द सीझन – कामिंदू मेंडिस (१० लाख रुपये)
फेअर प्ले अवॉर्ड ट्रॉफी – चेन्नई सुपर किंग्स
पर्पल कॅप – प्रसिद्ध कृष्ण (१० लाख रुपये)ऑरेंज कॅप – साई सुदर्शन (१० लाख रुपये)
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर ऑफ द सीझन – सूर्यकुमार यादव (१५ लाख रुपये)पिच अँड ग्राउंड अवॉर्ड – दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (५० लाख).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *