
परभणी ः राज्यस्तरीय स्क्वॉश चॅम्पियनशिपसाठी परभणी जिल्हा स्क्वॉश संघाची निवड करण्यासाठी शुक्रवारी (६ जून) निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव कैलास माने यांनी दिली.
महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट असोसिएशन व पुणे जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अंडर ११, अंडर १३, अंडर १५, अंडर १७, अंडर १९ व महिला व पुरुष स्पर्धेचे आयोजन पुणे या ठिकाणी १० ते १५ जून या दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये परभणी जिल्हा स्क्वॉश रॅकेट संघ सहभागी होणार आहे.
परभणी संघाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन ६ जून रोजी स्क्वॉश हॉल सिटी क्लब परभणी या ठिकाणी दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी सोबत आधार कार्ड झेरॉक्स, बोनाफाईड, दहावीवी सनद झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित राहावे.
या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार संजय उर्फ बंडू जाधव, सचिव कैलास माने, सहसचिव महेशकुमार काळदाते, सचिन ईजाते, मनीष जाधव, मानव माने, ऋषिकेश काळे, गणेश दराडे, सुमित भुसारे यांनी केले आहे.