सातारा जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 47 Views
Spread the love

जागतिक पर्यावरण दिन

सातारा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, बॅडमिंटन खेळाडू वैशाली आगाशे, प्रा अमर जाधव यांचे हस्ते वड, पिंपळ, बहावा, बदाम, महाराष्ट्राचे फूल जारुळ, आवळा, बॉटल ब्रश, अशोक, शिवरी, कांचन, निलगिरी, कवठ, रबर, लाल बहावा, नीलमोहर, पितमोहर अशी अनेक जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवा शुद्ध होते.ज्याचा फायदा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना होणार असून या ठिकाणी ऑक्सिजन हब तयार होण्यास मदत होईल तसेच, झाडे जमिनीची धूप रोखतात आणि पाण्याचा साठा वाढवतात, ज्यामुळे पाण्याची समस्या कमी होते. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश होता, जेणेकरून परिसरातील जैवविविधता टिकून राहील. कार्यक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूनी झाडांची काळजी घेण्याचे ठरले. जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले आणि भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी अधिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये पर्यावरणाचे महत्त्व अधिक दृढ झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *