जळगाव जिल्हा अंडर ११ बुद्धिबळ स्पर्धा शनिवारी

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

जळगाव ः जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षांखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन ७ जून शनिवारी सकाळी १० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ जळगाव येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेतून पुणे येथे १३ ते १५ जून दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी दोन मुले व मुली यांची निवड राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात येईल. ११ वर्षे वयोगटासाठी १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेसाठी पात्र राहतील.
स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ येथे होतील. स्पर्धकांनी नावनोंदणी कांताई सभागृह येथे प्रवीण ठाकरे, आकाश धनगर, परेश देशपांडे यांच्याकडे करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *