सोलापूर येथे १२ जूनपासून विजय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

सोलापूर ः ग्रीन फिंगर (आकलूज) पुरस्कृत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनतर्फे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जून रोजी एकदिवसीय विजय चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये व द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सात हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सर्व सामन्यांसाठी क्रिकेट असोसिएशनतर्फे बॉल देण्यात येतील. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी नाव नोंदवण्याची अंतिम तारीख १० जून असून त्याच रोजी संध्याकाळी क्रिकेट असोसिएशनमध्ये लॉट्स पाडले जाणार आहेत. ही स्पर्धा १२ जूनपासून सुरू होणार आहे. सर्व खेळाडू व क्लब रजिस्टर असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद शावंतूल (9145658016) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *