
छत्रपती संभाजीनगर ः हौशी बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० जून दरम्यान संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती येथे होणाऱ्या १२व्या वरिष्ठ पुरुष-महिला फेडरेशन कप राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचे एनआयएस प्रशिक्षक राष्ट्रीय पंच गणेश बेटूदे आणि संतोष आवचार यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र इखनकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना अध्यक्ष निलेश राऊत, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे, तांत्रिक कमिटीचे गोकुळ तांदळे, डॉ उदय डोंगरे, डॉ दिनेश वंजारे, डॉ संदीप जगताप, दीपक रुईकर, राकेश खैरनार, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, प्रवीण शिंदे, सचिन बोर्डे, भीमा मोरे, अजित झा, रफिक जमादार, स्वप्निल गुडेकर आदींनी अभिनंदन केले.