महाराष्ट्र राज्य कॉर्फबॉल पंच परीक्षेत विपुल कड उत्तीर्ण

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू विपूल गणेश कड याने राज्य कॉर्फबॉल पंच परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. 

महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशन व पिंपरी चिंचवड जिल्हा कॉर्फबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कॉर्फबॉल खेळाची पंच प्रशिक्षण शिबीर व पंच परीक्षेचे आयोजन ५ व ६ जून दरम्यान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू विपूल कड याने राज्य कॉर्फबॉल पंच परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत विपुल उत्तीर्ण झाला आहे.

विपुल कड याने बास्केटबॉल खेळासोबत कॉर्फबॉल खेळात देखील अत्यंत यशस्वी व आघाडीचा राष्ट्रीय  खेळाडू म्हणून व आता राज्य पंच म्हणून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. निश्चितपणे त्याच्या अनुभवाचा जिल्ह्याला भरपुर फायदा होणार आहे.

विपुल कडच्या घवघवीत यशाबद्दल राज्य व जिल्हा कॉर्फबॉल संघटनेचे पदाधिकारी प्रवीण मानवतकर, किशोर बागडे, सचिन वाव्हले, डॉ गौतम जाधव, बाबासाहेब मोहिते, डॉ उदय डोंगरे, गणेश कड, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव हेमंत पातूरकर, तसेच प्राचार्य डॉ मकरंद जोशी, प्रशांत बुरांडे, अनिस साहुजी, रेणुका कड, विश्वास कड, मंदा कड, धवल परिहार आदींनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *