श्रीलंकेतील स्पर्धेत रेनू कौर सिद्धू यांनी पटकावली चार पदके 

  • By admin
  • June 8, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

नागपूर ः मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सक्रिय सदस्य असलेल्या रेनू कौर सिद्धू यांनी श्रीलंकेतील सुगथदासा स्टेडियममध्ये झालेल्या ११ व्या मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारत आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करित चार पदके जिंकली.
 
महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनतर्फे स्पर्धेत सहभागी झालेल्या रेनू कौर यांनी २००० हून अधिक देशांतील आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये आपल्या असामान्य फिटनेस, सहनशक्ती आणि खेळातील जिद्दीचे दर्शन घडवले.

रेनू कौर सिद्धू यांनी या स्पर्धेत ५००० मीटर शर्यत २६ मिनिटे ५६ सेकंदात पूर्ण करून रौप्य पदक जिंकले. १५०० मीटर शर्यत ७ मिनिटे १९ सेकंदात पूर्ण करत रौप्यपदक पटकावले. ८०० मीटर शर्यत ३ मिनिटे २५ सेकंदात पूर्ण करुन रौप्य पदक संपादन केले. २००० मीटर स्टीपलचेस शर्यत १३ मिनिटे १८ सेकंदात पूर्ण करुन कांस्य पदकाची कमाई केली. 

रेनू कौर सिद्धू यांची ही कामगिरी हे दाखवते की, कठोर मेहनत, समर्पण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही वयात उत्कृष्टता प्राप्त करता येते. त्यांनी मास्टर्स स्पोर्ट्स समुदायात सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबाला दिले आणि सांगितले की, कुटुंबाच्या पाठबळा शिवाय हे यश शक्य नव्हते. त्या जय अ‍ॅथलेटिक क्लबच्या सदस्य आहेत. आणि विशेषत: आपल्या प्रशिक्षक सुनील कापगते यांचे त्यांनी आभार मानले, ज्यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे त्या हे यश मिळवू शकल्या. त्यांनी बाळू चौहान, अशोक कापता आणि पूर्णिमा यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *