
छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट ः प्रेम देशमुख सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने ओंकार रोडवेज संघाचा नऊ विकेट राखून पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात प्रेम देशमुख याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा घेण्यात आली. क्रिकेट प्रशिक्षक राहुल पाटील आणि संदीप जाधव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. १४ वर्षांखालील क्रिकेटपटूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अंतिम सामन्यात पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी अचूक व प्रभारी गोलंदाजी करुन ओंकार रोडवेज संघाला २० षटकात नऊ बाद ८४ धावसंख्येवर रोखून हा निर्णय सार्थ ठरवला. त्यानंतर पटेल हॉस्पिटल पाचोड संघाने अवघ्या १३.२ षटकात एक बाद ८५ धावा फटकावत नऊ विकेट राखून सामना जिंकला.
अंतिम सामन्यात दानिश शेख याने ४० चेंडूत ४५ धावांची शानदार खेळी केली. त्याने सहा चौकार मारले. अर्शन पठाण याने ४० चेंडूत २५ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार मारले. प्रत्युष गर्ग याने २२ चेंडूंचा सामना करत १४ धावांचे योगदान दिले. त्याने एक चौकार मारला. गोलंदाजीत प्रेम देशमुख (३-१०), अनुष दहिफळे (२-१२) व पार्थ भस्मे (१-०) यांनी प्रभावी मारा करत विकेट घेतल्या.
पारितोषिक वितरण
प्रमुख अतिथी अतुल वालेकर आणि सय्यद इब्राहिम यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी संयोजक राहुल पाटील व संदीप जाधव यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
फलंदाज ः वरद डहाळे
गोलंदाज ः श्री गिऱहे
मालिकावीर ः मयंक कदम
विकेटकीपर ः प्रत्युष गर्ग
संक्षिप्त धावफलक
ओंकार रोडवेज – २० षटकात नऊ बाद ८४ (वरद सुलताने ११, स्वप्नील वाधव ८, मयंक कदम ७, प्रत्युष गर्ग नाबाद १४, थोरात ५, पृथ्वीराज मते ८, इतर २३, प्रेम देशमुख ३-१०, अनुष दहिफळे २-१२, अर्शन पठाण १-२०, पार्थ भस्मे १-०) पराभूत विरुद्ध पटेल हॉस्पिटल पाचोड – १३.२ षटकात एक बाद ८५ (दानिश शेख ४५, अर्शन पठाण नाबाद २५, तुषार बडगुजर नाबाद १, इतर १४, राज घोडेले १-२). सामनावीर – प्रेम देशमुख.