खान सुरक्षा उपनिदेशक पदावर नितीन पारडकर यांची नियुक्ती

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

नागपूर ः भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत खान सुरक्षा महानिर्देशालय (डीजीएमएस) धनबाद येथे खान सुरक्षा उपनिदेशक (यांत्रिकी) पदासाठी संघ लोकसेवा (युपीएससी) आयोगाच्या वतीने नितीन बबनराव पारडकर यांची नियुक्ती करण्यात आली. 

या नियुक्तीबद्दल वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वैभवनगर, शिक्षक कॉलनी येथिल रहिवासी बबनराव पारडकर यांचा मुलगा नितीन पारडकर यांचा गावातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम एचटीकेबीएस क्लबचे संचालक व सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक राजेश भुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनायक इंगळे, बबनराव पारडकर, रामदास गिरडकर, रितेश गिरडकर, शिवम दांडेकर, गणेश दांडेकर, सोहम पारडकर, सेजल पारडकर, वीणा गिरडकर, रंजना दांडेकर, अनुष्का पारडकर व निकिता जुमडे उपस्थित होते. नितीन यांची झारखंड राज्यातील धनबाद मुख्यालयात करण्यात आली आहे. १२९ मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त २१ लोकांची निवड करण्यात आली असून, नितीन पारडकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *