पुणे येथे राज्य स्क्वॅश चॅम्पियनशिप, अमरावती जिल्ह्याचा संघ जाहीर 

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

अमरावती ः पुणे येथे १० ते १५ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंडर ११, १३, १५, १७, १९ मुले-मुली स्क्वॅश रॅकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. 

राज्य स्क्वॉश रॅकेट अजिंक्यपद स्पर्धा उंड्री येथील महराराष्ट्र स्क्वॅश अकादमी येथे होणार आहे. राज्य अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे व सरचिटणीस डॉ दयानंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. 

अमरावती जिल्हा क्रीडा संकुलातील स्क्वॅश कोर्टवर जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी सुमित थोरात, प्रसाद भाग्यवंत, पवन नाईक, वैभव झोंबाडे, ओम नागापुरे, रिया कासार तसेच संघटनेचे सचिव गणेश तांबे यांनी पार पाडली. राज्य स्पर्धेसाठी ३५-४० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडूंना अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके व माजी आमदार संजुभाऊ खोडके यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सुशिल सुर्वे, सतीश पहाडे,  संजय कथळकर, संजय पांडे, आर बी वडते, तालुका क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने,  त्रिवेंणी बांते, वैशाली इंगळे, क्रीडा अधिकारी तसेच क्रीडा विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती अमरावती स्वॅक्श रॅकेट संघटनेचे  सचिव गणेश तांबे यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *