
मुख्य संचालक सुंदर घाटे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक सुंदर घाटे यांनी नव्याने सुरू केलेल्या ईगल स्टार शुटिंग अकादमीचा उद्घाटन सोहळा बुधवारी (११ जून) होणार आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता ईगल स्टार शुटिंग अकादमीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रिमुस एनर्जी सोल्युसनचे सीईओ अनिल राव, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, राजपूत समाज असोसिएशन अध्यक्ष प्रवीणसिंग राठोड, कोषाध्यक्ष फतेहसिंग दहिया, जिल्हा रायफल संघटनेचे सचिव अनंद बर्वे, प्रसिद्ध उद्योजक मनीष धूत, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संदीप तरटे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सिमा राहुल पटवर्धन, आयएसएसएफ ज्युरी हेमंत मोरे, ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक सोमनाथ पाटील, सिडको प्रशासक गजानन साटोटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम पातारे, गणेश प्लायचे संचालक रुपेश शिरसाट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत शिनगारे, उमेश पटवर्धन, प्रकाश फाटक, पी व्ही कुलकर्णी, दिलीप पटवर्धन, प्रकाश साखरे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे, अशी माहिती ईगल स्टार शुटिंग अकादमीचे मुख्य संचालक सुंदर घाटे यांनी दिली.

ईगल स्टार शुटिंग अकादमी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर २४-२३ इ-सेक्टर या ठिकाणी आहे. मिलिनियम पार्कच्या बाजूला ही अकादमी आहे. अधिक माहितीसाठी ९८२३२२२२०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य संचालक सुंदर रामचंद्र घाटे यांनी केले आहे.