
जळगाव ः जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ ते २९ जून दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १३, १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५ प्लस वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. नाव नोंदणीची अंतिम २४ जून २०२५ असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी किशोर सिंह (९९७०४१४९५४), कांताई सभागृह जैन स्पोर्ट्स अकॅडमी, नवीन बस स्टँड जवळ यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.