< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); शिवम फाऊंडेशनतर्फे फटाले स्मृती बॉक्सिंग स्पर्धा रविवारी – Sport Splus

शिवम फाऊंडेशनतर्फे फटाले स्मृती बॉक्सिंग स्पर्धा रविवारी

  • By admin
  • June 11, 2025
  • 1
  • 158 Views
Spread the love

पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने शिवम फाउंडेशनतर्फे आयोजित चेतन फटाले यांच्या स्मरणार्थ रविवारी (१५ जून) २५ व्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा भवानी पेठ येथील जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे होणार आहे. यामध्ये सब ज्युनिअर, ज्युनियर, युथ, वरिष्ठ गट मुले व मुली अशा चार गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत अनेक माजी राष्ट्रीय खेळाडू व पुरस्कार विजेते उपस्थित रहाणार आहेत.

स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. अधिक माहितीसाठी स्पर्धा व्यवस्थापक प्रदीप वाघे (7559482636) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले आहे.

1 comment on “शिवम फाऊंडेशनतर्फे फटाले स्मृती बॉक्सिंग स्पर्धा रविवारी

  1. SIRNAME : Sonwal
    NAME : Sandhya
    FATHERS NAME : Jitendra
    MOTHER NAME : Rupali
    DATE OF BIRTH: 09/08/2012
    WEIGHT: 37 TO 40
    CLUB: Star Boxing club

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *