
रायगड ः बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा खेळाडू विजेते ठरले आहेत. त्यातील रायगड मधील १२ वर्षीय वैदेही जाधव हिने ३६ किलो वजनी गटात भारताला रौप्य पदक जिंकून दिले.
भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान या देशांसह २५ देशातील खेळाडूंचा समावेश या स्पर्धेत होता. या स्पर्धेचे उद्घाटन थायलंडच्या राष्ट्रपती पेटोंग टॉर्न र्सिन्हामात्र यांनी केले.
माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांनी या कामगिरीचे कौतुक केले आहे. बॉक्सर वैदेही जाधव ही सध्या नेरळ येथे राहत असून सावंतवाडीची रहिवासी असल्याने संपूर्ण जाधव परिवारातर्फे कौतुकाची थाप दिली जात आहे.
इंडिया थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष पाषा अत्तर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वैदेहीच्या या यशस्वी कामगिरीसाठी प्रशिक्षक स्वप्निल आडूरकर, करण बाबरे व शाळेच्या शिक्षिका व शिक्षक वृंद या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.