
पुणे ः विक्टोरियस चेस अकॅडमी आणि रिलायन्स मॉल एरंवडणे यांच्या संयुक्त विद्यमाने ६ रविवारी रॅपिड बुद्धिबळ सिरीजमध्ये ओपन गटात निर्गुण केवल याने विजेतेपद पटकावले.
रिलायन्स मॉल, एरंडवणे या प्रशस्त, केंद्रस्थानी आणि अत्यंत अनुकूल ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण १४७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यामुळे बुद्धिबळातील वाढती लोकप्रियता आणि विद्यार्थ्यांमधील रस स्पष्टपणे दिसून आला. नेहमीप्रमाणेच रिलायन्स मॉलने एरंडवणे उत्तम व्यवस्थापन, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करून स्पर्धेच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे, विक्टोरियस चेस अकॅडमीचे संस्थापक व संचालक कपिल लोहाना, ज्येष्ठ शैक्षणिक मार्गदर्शक व लेखिका डॉ. ज्योतिका के. लघाटे आणि रिलायन्स मॉल, एरंडवणेचे मॅनेजर प्रतीक वाखारिया यांची उपस्थिती होती.
अंतिम निकाल
ओपन गट ः १. निर्गुण केवल, २. प्रियांशु पाटील, ३. लथिक राम.
अंडर १५ गट : १. शर्वी बाकलीवाल, २. वरद दिनेश गायकवाड, ३. हर्ष विराज भंडारी.
अंडर १३ गट : १. युग विशाल बर्दिया, २. सिद्धांत साळुंके, ३. अमेय चौधरी.
अंडर ११ गट : १. नैतिक व्ही. माने, २. स्वराज मुल्ले, ३. प्रध्योत मिश्रा.
अंडर ९ गट : १. निवान अग्रवाल, २. गोरांक्श खंडेलवाल, ३. शौर्य दीपक सोनावणे.
अंडर ७ गट : १. चिराक्ष गर्ग तरुण, २. सक्षम साहा, ३. सन्मित सतेज जोशी.
सर्वोत्तम महिला खेळाडू : १. गिरीषा प्रसन्ना पै, २. तन्वी कुलकर्णी, ३. श्रावणी उंडाळे.
सर्वोत्तम व्हीसीए खेळाडू : १. ओम रामगुडे, २. अर्णव तापकीर, ३. मिहिर रामपल्ली.
श्रेष्ठ ज्येष्ठ खेळाडू : राहुल बावडेकर.