< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); पुणे येथे राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत ३०२ खेळाडूंचा सहभाग – Sport Splus

पुणे येथे राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत ३०२ खेळाडूंचा सहभाग

  • By admin
  • June 12, 2025
  • 0
  • 54 Views
Spread the love

पुणे ः पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एच२इ पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य ११ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या गटात फिडे रेटेड निवड बुद्धीबळ स्पर्धेत २७ जिल्ह्यांतून ३०२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह या ठिकाणी १३ ते १५ जून या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेला एच२इ पॉवर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले असून एकूण ३० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेत पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे, गडचिरोली, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा या ठिकाणाहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये खुल्या गटात सक्षम उपाध्याय (१९२२,पुणे), अर्जुन सिंग (१८०८,मुंबई उपनगर), कविश लिमये (१८०५,पुणे), शितिज प्रसाद (१८०४,पुणे) यांचा तर, मुलींच्या गटात कार्तिक उतारा (१६२४, ठाणे), भूमिका वाघले (१६२४) हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेतील खुल्या गटातील अव्वल सहा खेळाडूंची व मुलींच्या गटातील अव्वल चार खेळाडूंची निवड आगामी जळगाव येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत होणार असून हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

आयए अथर्व गोडबोले चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय बुद्धिबळपटू व कमांडंट एकेएस श्रीमननारायणा (ऑफिसर, इंडियन कोस्ट गार्ड), एमसीएचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर आणि मानद सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते १३ जून रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *