कबड्डी संघ निवड समितीवर दत्ता टेके यांची निवड

  • By admin
  • June 12, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः शिवपूर गावचे भूमिपुत्र व शिवनेरी कबड्डी संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रशिक्षक दत्ता टेके यांची हरिद्वार येथे १८ वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघ निवडीसाठी निवड समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

१४ ते १८ जुन दरम्यान बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे होत असलेल्या १८ वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जिल्ह्यांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. मुलांच्या कबड्डी संघाच्या निवड समिती सदस्यपदी छत्रपती संभाजीनगरचे दत्ता टेके यांची निवड करण्यात आली आहे.

दत्ता टेके यांची कारकीर्द
कबड्डीचा वारकरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत असणारे दत्ता टेके हे शिवनेरी कबड्डी संघाचे संस्थापक आहेत. दत्ता टेके यांनी आपल्या गावात शिवनेरी कबड्डी संघाची स्थापना केली. शिवनेरी क्रीडा मंडळ शिवपूरच्या माध्यमातून कबड्डी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. अनेक स्पर्धा गाजवल्या. त्याच बरोबर अनेक खेळाडू घडवले आहेत. या निवडीबद्दल डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, डॉ विजय पाथ्रीकर, डॉ माणिक राठोड आदींनी टेके यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *