ईगल स्टार शुटींग अकॅडमीचे थाटात उद्घाटन 

  • By admin
  • June 14, 2025
  • 0
  • 39 Views
Spread the love

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुंदर घाटे यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उभारली आधुनिक रेंज 

छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक सुंदर घाटे यांनी उभारलेल्या ईगल स्टार शुटींग रेंज अकॅडमीची थाटात सुरुवात करण्यात आली. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या ईगल शुटींग रेंजचे उद्घाटन प्रिमुस एनर्जी सोल्यूशन कंपनीचे सीईओ अनिल राव यांच्या हस्ते करण्यात आले. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ई सेक्टर, प्लॉट नंबर २३, २४ मिलिनियम पार्कच्या शेजारी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुंदर घाटे यांनी ईगल स्टार शुटींग रेंज अकॅडमी उभारली आहे. ऑलिम्पिक दर्जाची ही शुटींग रेंज अकॅडमी आहे. या शुटींग रेंजमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आधुनिक दर्जाच्या आहेत. ईगल स्टार शुटींग रेंज अकॅडमीच्या खेळाडूंसाठी शस्त्र ठेवण्याकरिता सुरक्षित लॉकर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुंदर घाटे यांच्या मार्गदर्शनासह खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा फिजिओ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 

प्रिमूस एनर्जी सोल्यूशनचे सीईओ अनिल राव यांनी ईगल स्टार शुटींग अकॅडमीचे उद्घाटन केले व मुख्य संचालक सुंदर घाटे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक गौतम पातारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत शिनगारे, आंतरराष्ट्रीय नेमबाज ज्युरी हेमंत मोरे यांची उपस्थिती होती आणि त्यांनी मार्गदर्शन केले. 

उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा रायफल संघटनेचे सचिव अनंत बर्वे, उमेश पटवर्धन, सीमा पटवर्धन, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, प्रवीणसिंग राठोड, फतेहसिंग दहिया, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सोमनाथ पाटील, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, नेमबाज मधुमिता चंद्रमोरे, रुपेश सिरसाट, जीवन बैनाडे, डॉ मीनाक्षी मुलीया, आस्मा सय्यद, शिल्पा चव्हाण, संजू तिवारी, निता काळवे, सुजाता मोरे, अक्षय कांबळे, इरफान सय्यद आदी उपस्थित होते. डॉ विशाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती घाटे यांनी आभार मानले. या प्रसंगी नेमबाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *