< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); ४ एस पुणेरी बाप्पा-ईगल नाशिक टायटन्स लढत पावसामुळे रद्द – Sport Splus

४ एस पुणेरी बाप्पा-ईगल नाशिक टायटन्स लढत पावसामुळे रद्द

  • By admin
  • June 15, 2025
  • 0
  • 66 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ईगल नाशिक टायटन्स संघाने आपल्या सलामीच्या जोडीत बदल केला. पण तो यशस्वी ठरला नाही. साहिल पारीख अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने त्याला झेलबाद केले.

त्यानंतर अर्शिन कुलकर्णी व मंदार भंडारी या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ६९ धावांची खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मंदार भंडारीने २४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. त्यात त्याने १ चौकार व ३ षटकार खेचले. मंदार भंडारीला ३६ धावांवर सोहन जमालेने झेलबाद केले. अर्शिन याने ३३ चेंडूत नाबाद ४८ धावांची आक्रमक खेळी केली. अर्शिनने १ चौकार व ५ उत्तुंग षटकार ठोकले. रोहन दामलेने नाबाद १६ धावा काढून साथ दिली.

ईगल नाशिक टायटन्स संघ १३ षटकात ३ बाद ११३ धावावर असताना पाऊस सुरु झाला. सतत पडत असलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. गुणतालिकेत पुणेरी बाप्पा संघ ७ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून ईगल नाशिक टायटन्स संघ १० गुणांसह अव्वल स्थानी आहेत.

संक्षिप्त धावफलक

ईगल नाशिक टायटन्स : १३ षटकात ३ बाद ११३ धावा (अर्शिन कुलकर्णी नाबाद ४८, मंदार भंडारी ३६, रोहन दामले नाबाद १६, निकित धुमाळ १-१४, सोहन जमाले १-१९, सचिन भोसले १-२७).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *