< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); शिरपूर येथे केव्हीपीएस संस्थेच्या क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर – Sport Splus

शिरपूर येथे केव्हीपीएस संस्थेच्या क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर

  • By admin
  • June 15, 2025
  • 2
  • 334 Views
Spread the love

शिरपूर ः किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे संस्थेतील सर्व क्रीडा शिक्षकांचे सामूहिक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४५ क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला.

किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून उत्तम प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकासासोबत त्यांचा शारीरिक विकास साधून एक सक्षम विद्यार्थी तयार व्हावा या दूरदृष्टीकोनातून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ तुषार विश्वासराव रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या क्रीडा शिक्षकांची एक क्रीडा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कृतिशील उपक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये संस्थेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासकीय शालेय स्पर्धांमध्ये तसेच असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली, योग अभ्यास, नाविन्यपूर्ण परिपाठ व कवायत, विविध खेळांच्या नियमात झालेले बदल व आधुनिक कौशल्य इत्यादी विषयांवर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या एकूण ४५ क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला होता.

प्रशिक्षण वर्गाची सुरुवात क्रीडा समिती प्रमुख प्रा राकेश बोरसे व सहाय्यक योग शिक्षक संजय मोते यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिवसाची पूर्वतयारी म्हणून योग अभ्यासाने करण्यात आली. योग वर्गात प्रार्थना सूर्यनमस्कार व विविध स्थितीतील योग असण्याचा अभ्यास सहभागी शिक्षकांकडून करून घेण्यात आला. त्यानंतर उमेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानवर्धक व आनंददायी परिपाठ आणि संगीतबद्ध कवायत यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन करून दाखवले.

राकेश बोरसे यांनी ऑनलाइन स्पर्धा सहभाग व खेळाडू नोंदणी याचे तांत्रिक प्रशिक्षण शिक्षकांना दिले. प्रा राधेश्याम पाटील, जिनेश पराडके, नूर तेली, हेमंत शिरसाट यांनी अॅथलेटिक्स, खो-खो, व्हॉलिबॉल व कबड्डी या खेळांचे नियम व आधुनिक कौशल्य शिक्षकांना स्पष्ट केले. प्रशिक्षण वर्गाच्या शेवटी सामूहिक चर्चा करून सदर शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी कसे मनोरंजक व आरोग्यदायी करता येईल याचे नियोजन व प्रशिक्षण वर्गाबद्दल शिक्षकांचे अभिप्राय घेऊन करण्यात आला.

प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक के डी बच्छाव यांच्या नेतृत्वात क्रीडा समितीचे सदस्य एम टी चित्ते, डॉ लिंबाजी प्रताळे, डॉ विशाल पाटील, संदीप डोळे, तारासिंग पावरा, हर्षल पाटील, विजेंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.

2 comments on “शिरपूर येथे केव्हीपीएस संस्थेच्या क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *