पुण्यातील राज सिंग यांनी वयाच्या ६३व्या वर्षी पटकावली सहा पदके

  • By admin
  • June 15, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

मुंबई ः पुण्यातील ६३ वर्षीय बॅडमिंटन खेळाडू राज सिंग यांनी अवघ्या तीन आठवड्यात दोन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहा पदके जिंकून भारताचा तिरंगा फडकावला.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तैवानमधील तैपेई येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्स २०२५ मध्ये राज सिंगने पुरुष दुहेरी आणि एकेरी स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनी ६० प्लस एकेरी गटात सुवर्णपदक मिळविले व इंडोनेशियाच्या गुरजीत सिंगसोबत ६० प्लस पुरुष दुहेरी गटात रौप्यपदक मिळवून धमाल उडवून दिली

त्यानंतर त्यांनी कोलंबो श्रीलंकेत झालेल्या सिलोन मास्टर्स बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भाग घेतला. या स्पर्धेत त्यांनी ६० प्लस एकेरी, ६० प्लस मिश्र दुहेरी गटात, मिश्र दुहेरी गट (दोघांनी मिळून १२० प्लस) आणि पुरुष दुहेरी ६० प्लस गटात भाग घेतला होता. त्यांनी ६० प्लस एकेरीत सुवर्णपदक, ६० प्लस मिश्र दुहेरी प्रकारात चेन्नईच्या विद्या गणेशसोबत रौप्यपदक व तिच्या साथीने दोघांनी मिळून १२० प्लस मिश्र दुहेरीत रौप्यपदक आणि ६० प्लस दुहेरीत दुहेरीत भारताच्या रमेश कुमार सोबत कांस्यपदक पटकावले. एकूण चार पदकांची लयलूट करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेत भारताचे नाव उंचावले.

या सर्व कामगिरी अत्यंत स्पर्धात्मक ६० वर्षांवरील वयोगटातील गटात झाली आहे हे विशेष. यावरून हे सिद्ध होते की, वय खरोखरच एक संख्या आहे. राज सिंगची ऊर्जा, शिस्त आणि खेळाबद्दलची आवड यामुळे भारताला केवळ गौरव मिळाला नाही तर वयाची पर्वा न करता असंख्य खेळाडूंना त्यांच्या क्रीडा स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रेरित केले आहे.

त्यांच्या दिनचर्याबद्दल बोलताना राज सिंग म्हणाले की, “माझा दिवस पहाटे ४ वाजता एका समर्पित कसरत वेळापत्रकासह सुरू होतो. मी एक तास योगा, त्यानंतर ट्रेकिंग सत्र, ताकद प्रशिक्षण आणि नंतर दोन तास बॅडमिंटन सरावाने सुरुवात करतो.”

त्याच्या अनुभवाचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की, “ही माझी पहिली सिलोन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा असल्याने मी माझ्या शुभचिंतकांना आणि फिजिओथेरपी टीमला २५ हून अधिक टी-शर्ट वाटले. ज्यांनी मला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत खूप पाठिंबा देऊन महत्त्वाची भूमिका बजावली. मी आता २०२६ मध्ये अबू धाबी येथे होणाऱ्या मास्टर्स स्पर्धेसाठी तयारी करत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *