राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी अक्षरा खडसेची निवड

  • By admin
  • June 15, 2025
  • 0
  • 80 Views
Spread the love

यवतमाळ ः अकरावी महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे पहिल्या वर्गात शिकत असलेल्या अक्षरा अंकुश खडसे हिने ६ ते ७ वर्षे वयोगट २० किलो वजन गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत दोन पदके जिंकली.

अक्षरा खडसे हिने कुमिते (कराटे फाईट) मध्ये सुवर्णपदक आणि काता या प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवून राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले. अक्षरा खडसे ही गेल्या वर्षापासून नियमित सराव कराटे स्पोर्ट्स अकॅडमी यवतमाळ येथे सुजित पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. राष्ट्रीय कराटे स्पर्धा २९ व ३० जून २०२५ रोजी उदयपूर राजस्थान येथे संपन्न होणार आहे.

स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र डांगे, संचालक यशवंत डांगे, मुख्याध्यापक कृष्णा कुमार व अक्षराचे कराटे मार्गदर्शक प्रशिक्षक तसेच स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक सुजित पत्रे, पियुष चांदेकर व शाळेतील सर्व शिक्षकवर्ग यांनी अक्षराचे कौतुक करून राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता अक्षराला शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *