< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); आंतरराष्ट्रीय जीत-कुने-डो स्पर्धेत समर्थ, श्लोक, अभयला सुवर्ण – Sport Splus

आंतरराष्ट्रीय जीत-कुने-डो स्पर्धेत समर्थ, श्लोक, अभयला सुवर्ण

  • By admin
  • June 17, 2025
  • 0
  • 105 Views
Spread the love

अदनान, पवनने पटकावले रौप्यपदक 

छत्रपती संभाजीनगर ः मुंबई येथील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे वर्ल्ड स्पोर्ट्स जीत-कुने-डो फेडरेशनतर्फे घेण्यात आलेल्या २३ व्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स जीत-कुने-डो स्पर्धेत सुमारे १४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात आर. जे. अकॅडमी व महेंद्राज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीच्या सहा मार्शल आर्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवला. होता.

या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र गिहारा यांनी केले होते या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र स्पोर्ट्स हौशी कराटे असोसिएशनचे सचिव प्रकाश नकाशे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत समर्थ जोरले याने काता प्रकारात कांस्य आणि कुमिते प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. श्लोक महाजन याने काता प्रकारात कांस्य आणि कुमिते प्रकारात सुवर्ण पदक आणि अभय लोखंडे याने काता प्रकारात रौप्य आणि कुमिते प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. अदनान पठाण याने काता प्रकारात रौप्य पदक, पवन गायकवाड याने काता प्रकारात रौप्य पदक, ऋषिकेश मोरे याने काता प्रकारात कांस्य पदक पटकावले.

या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य महेंद्र रंगारी, रहीम जमादार, चिन्मय कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेदरम्यान टीम मॅनेजर म्हणून फिरोज शेख यांनी काम पहिले. या सर्व विद्यार्थ्यांना शहर व जिल्हा सिकाई मार्शल आर्ट असोसिएशनचे सचिव रफिक जमादार, रवी ढीवरे, सतीश ढोले, ज्ञानेश्वर दराडे, प्रज्योत पारधे यांनी डॉ शत्रुंजय कोटे, डॉ मकरंद जोशी, डॉ आर ए सिद्दिकी, डॉ मीनाक्षी मुलीया, डॉ सागर कुलकर्णी, अॅड गोपाल पांडे, विनायक पांडे, किरण कुलकर्णी, अनिता सिन्नरकर, महेश विभांडीक, स्वप्नील परदेसी, पूजा पांडे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *