पुणे जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग

  • By admin
  • June 18, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

चेतन फटाले स्मृती स्पर्धा

पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने शिवम फाउंडेशनच्या वतीने आयोजित चेतन रवींद्र फटाले स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम पुणे येथे २५ व्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवम फाऊंडेशनचे अध्यक्ष जयसिंगराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

सांगवी येथील साई बॉक्सिंग क्लबचा खेळाडू प्रज्वल सितापुरे याने नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेतील “बेस्ट बॉक्सर” पुरस्कार पटकावला. एमआयजेएस बॉक्सिंग क्लबच्या गार्गी तांबे हिने “मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर”, तर महाराणा प्रताप बॉक्सिंग क्लबच्या प्रितेश राठोड याने “बेस्ट चॅलेंजर” हा बहुमान पटकावला.

पारितोषिक वितरण समारंभ
लायन्स क्लब, पुणे शहरचे अध्यक्ष दीपक थोरात, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, रवींद्र फटाले, राजेंद्र तांबेकर, राजेश टिकार, शिवम फाउंडेशनचे सचिव सुरज रेणुसे, शिवम फाउंडेशनचे कार्याध्यक्ष स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाश रेणुसे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शहर संघटनेचे सचिव विजय गुजर, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, आंतरराष्ट्रीय ऑफिशियल कॅप्टन सुरेश कदम, आंतरराष्ट्रीय खेळाडू कॅप्टन तुक बहादूर थापा आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे शहराचे आरओसी कमिशन चेअरमन सुरेश गायकवाड, महाराष्ट्र टेक्निकल ऑफिसर अशोक मेमजादे, डॉ राहुल पाटील, जीवन निंदाने, असिफ शेख, रॉबर्ट दास, उमेश जगदाळे, प्रदीप वाघे, कुणाल पालकर, शकील शेख आदी पंचांनी स्पर्धेचे आयोजनात मोलाची कामगिरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच ऋषीकांत वचकल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *