नाशिक येथे २५ जून रोजी सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • June 18, 2025
  • 0
  • 121 Views
Spread the love

नाशिक ः नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुलात २५ जून रोजी खुल्या गटाच्या नाशिक जिल्हा सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू २८ ते ३० जून दरम्यान मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

नाशिकमध्ये आयोजित राज्य स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यांच्या संघांची कामगरी उत्तम व्हावी यासाठी निवड झालेल्या खेळाडूंचे २६ आणि २७ जून रोजी येथेच सकाळ आणि सायंकाळ दोन सत्रात चांगला सराव करून घेतला जाणार आहे. ज्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे अशा खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी संस्था पदाधिकारी यांनी स्पर्धा आयोजन प्रमुख दीपक निकम (९५९५३४३४३५) यांच्याशी संपर्क करून आपले प्रवेश निश्चित करावे.

ही स्पर्धा नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी असल्यामुळे खेळाडूनी आपले आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, कार्याध्यक्ष आनंद खरे, सचिव दीपक निकम, कार्यकारी सदस्य योगेश पाटील, अनिल गायकवाड केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *