
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी नुकतीच व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथील टॉन ड्युक थांग युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्पोर्ट्स सायन्स या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला. या परिषदेला विविध देशांतील नामवंत क्रीडा शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला होता.
डॉ मोतीयेळे यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड ॲनालिसिस यांच्यातर्फे आयोजित योगावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेतही सहभाग नोंदवला. तसेच वर्ल्ड सोसायटी फॉर पीस स्पोर्ट्स यांच्यातर्फे हनोई, व्हिएतनाम येथे आयोजित ‘वर्कशॉप ऑन स्पोर्ट्स फॉर पीस २०२५’ मध्ये देखील ते सहभागी झाले होते.
या कार्यशाळांमध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील प्राध्यापक आणि संशोधक यांचा गौरव करण्यात आला. डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांना गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘इंटरनॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड ॲनालिसिस या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला.
या परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी टॉन ड्युक थांग युनिव्हर्सिटीचे स्पोर्ट सायन्स विभागाचे असोसिएट प्राध्यापक प्रो डॉ त्रिनह ट्रग हिऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, विभागप्रमुख डॉ दिनेश वंजारे तसेच डॉ सदाशिव जव्हेरी, डॉ शशिकांत सिंग, प्रा रहीम खान, निलेश खरे आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.