आजेगाव येथे विविध खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप 

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

हिंगोली ः हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कुरेशी स्पोर्ट्स फाउंडेशन आजेगाव यांच्या वतीने आजेगाव येथे पाच दिवसांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप नुकताच संपन्न झाला. 

या पाच दिवशीय शिबिरामध्ये ४० मुले तर २० मुलींनी सहभाग नोंदविला होता. सर्व सहभागी खेळाडूंना क्रिकेट, सॉफ्ट टेनिस, कराटे, बेसबॉल, बुद्धिबळ, टेनिक्वाइट व ॲथलेटिक्स या खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. 

सर्व खेळाडूंना रोज सकाळी नाष्टा, दुपार व संध्याकाळी जेवण अगदी मोफत देण्यात आले. वसीम देशमुख, अशोक जयाजी चाटसे, बी डी चाटसे, रामेश्वर नालींदे, विलास कऱ्हाळे, विनोद जाधव यांनी अन्नदान केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रा. तायडे, जाधव अर्थमूव्हर्स कडती, सचिन बुधे, सचिन रामचंद्र दराडे यांच्याकडून टी-शर्ट वाटप करण्यात आले तर जयाजी कृष्णाजी चाटसे, संदीप जनार्दन चौधरी, मल्लिकार्जुन तुळशीराम नालींदे, शिवानंद नालबंद यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला सन्मानचिन्ह ट्रॉफी देण्यात आली. प्रारंभी सेवाभावी संस्था आजेगाव व रामदास जाधव यांच्या वतीने खेळाचे साहित्य पुरविण्यात आले.

या शिबिरामध्ये एकता स्पोर्ट्स हिंगोलीचे ॲथलेटिक्स प्रशिक्षक गजानन आडे, कराटे प्रशिक्षक बजरंग कदम, सॉफ्ट टेनिस प्रशिक्षक प्रकाश अडकिने, वंश, टेनिकॉइटचे प्रशिक्षक रहीम कुरेशी,  बेसबॉल प्रशिक्षक विशाल कदम, क्रिकेट प्रशिक्षक शंकर पोघे व रहीम कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्रशिक्षण दिले.

हे प्रशिक्षण शिबिर रहीम कुरेशी व शंकर पोघे यांच्या कल्पनेतून तर पृथ्वीराज अवस्थी, यश नालिंदे, ऋषी डोळस, साईनाथ पतंगे, हर्षल जाधव, कृष्णा रोहडकर, कृष्णा नालींदे यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *