परभणी जिल्हा सिनियर सेपक टकरा संघाची निवड चाचणी शनिवारी

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

सेलू ः महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशन मान्यतेने नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने नाशिक येथे २८ ते ३० जून दरम्यान राज्य सिनियर पुरुष आणि महिला गट सेपक टकारा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेकरिता सेपक टकरा असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा सेपक टकरा पुरुष आणि महिला संघाची निवड चाचणी आयोजन २१ जून रोजी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, मानवत रोड, रेल्वे स्टेशन, कोल्हा फाटा येथे दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या निवड चाचणीत सहभागी होणाऱया खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो आणावेत.

परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राजेश विटेकर, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे, मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, प्रशांत नाईक, नागेश कान्हेकर,सज्जन जैस्वाल, अब्दुल अन्सार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कैलास टेहरे (98609 14540), अनुराग अंबटी (8830073631) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *