बुद्धिबळ स्पर्धेत सुदीप पाटीलला विजेतेपद, ऋग्वेद पोतदार उपविजेता 

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत अग्रमानांकित सुदीप पाटील याने अपेक्षेप्रमाणे विजेतेपद पटकावले तर दिग्गजांना धक्का देत ऋग्वेद पोतदार याने उपविजेतेपद पटकावून संघात स्थान मिळवले आहे.

या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेद्वारे पहिल्या दोन खेळाडूंची निवड जिल्हा संघात करण्यात आली आहे. आगामी राज्य अमॅच्युअर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजयी संघ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेबरोबर ब्लिट्झ या लोकप्रिय प्रकारातील स्पर्धेचे पण आयोजन करण्यात आले होते.दोन्ही स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

पारितोषिक वितरण प्रसंगी विजयी संघाचा गौरव करण्यात आला. तसेच विविध वयोगटातील विजेतेना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे उद्योजक बबलू त्रिवेदी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी लायन्स सेंट्रलचे अध्यक्ष संतोष गांधी, जयेश सुराणा, विशाल पांडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल, संदीप करवा यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब सोनवणे यांनी केले तर विलास राजपूत यांनी आभार मानले.

अंतिम निकाल 

१. सुदीप पाटील, २. ऋग्वेद पोतदार, ३. गौरव वैदणे, ४. अर्णव तोतला, ५. राधिका तिवारी, ६. आशिष संकलेचा.

वयोगट १३ मुले आणि मुली – १. प्रथमेश कोल्हे, २. पार्थ बागला. मुली – १. समृद्धी काळे, २. जान्हवी देशमुख.

वयोगट ११ व ९ ,७ वर्षांखालील विजेते मुले व मुली – १. हिमांशू बागला, २. रसराज निकम. १. श्रीतेज तांबे, १. कायरा मालाणी, १. प्रीयल शिखरे, १. कृष्णा अरोडा. 

ब्लिट्झ स्पर्धेचा निकाल : १. राजवर्धन झंवर, २. सारंग कुलकर्णी, ३. सोहम साळुंके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *