गोल्फ स्पर्धेत अन्वेषा महाडीक, रियांश सुतारला विजेतेपद 

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

पुणे ः वेस्टर्न इंडिया आयजीयू ज्युनियर व हौशी फीडर २०२५ गोल्फ स्पर्धेत ज्युनियर गटातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अन्वेषा महाडीक व रियांश सुतार यांनी ज्युनियर गोल्फ चषकाचे मानकरी होण्याचा बहुमान संपादन केला. 

नुकत्याच पुण्यात वेस्टर्न इंडिया आयजियू व हौशी फीडर २०२५ च्या गोल्फ स्पर्धेचे आयोजन पुना गोल्फ क्लब येथे गोल्फ मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. ज्युनियर गोल्फ स्पर्धेमध्ये अतिशय अतितटीचे अंतिम सामना झाले. त्यात अन्वेषा महाडीक व रियांश सुतार यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवित यवर्षीच्या ज्युनियर २०२५ च्या चषकाचे मानकरी ठरले.

या गोल्फ मालिकेची सुरुवात १७ जून रोजी पुना गोल्फ क्लब येरवडा येथे झाली. या गोल्फ स्पर्धेतील विजेत्यांना पुना गोल्फ क्लबचे कॅप्टन इक्रम खान यांच्या हस्ते चषक आणि बक्षीस देण्यात आले.

वेस्टर्न इंडिया आयजीयू ज्युनियर आणि हौशी फीडर गोल्फ स्पर्धे मधील विविध गटातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. ज्युनियर विजेते आणि उपविजेते  प्रथम क्रमांक रियांश हृषिकेश सुतार, सर्वोत्तम गोल्फर कबीर विवेक मासाळ तर विक्रांत उमेश तटकरे, श्रेयन जरंगल यांच्यासह शिवानी मोहंती, अन्निका कानिटकर, आदोर दास, अभिराम महाजन, नोया सहरवाला, अविराजसिंग औलख, अगस्त्य अग्रवाल, विवान शैलेश कुदळे, अन्वेषा महाडिक, ओमिषा मोहंती, जिया कर्दभजने, इशांत संजय शिकरे, अन्वेषा महाडिक, ओमिषा मोहंती, जिया कर्दभजने, मोहनीश मेलवानी, मिहिर कदम,विदिश कर्दभजने या विजेत्या-उपविजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

सुपर सीनियर्स (६० वर्षांहून अधिक), ज्येष्ठ नागरिक (५० वर्षांवरील), हौशी (३५ वर्षांहून अधिक) अशा गटांमध्ये सुनील शिरोळे, राजेश अग्रवाल, दीपक पांडे, शैलेश कुदळे, विकास शेवरे, रेहान पोंचा, विदिश कर्दभजने, अवनीश सोमयाजी, सुमेध गांगल यांनी यश संपादन केले. पुना गोल्फ क्लबचे कॅप्टन इक्रम खान यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *