सोलापूर येथे शांभवी चषक क्रिकेट स्पर्धा २५ जूनपासून

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

सोलापूर ः क्रिकेटचे ज्येष्ठ संघटक व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार जे टी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने शांभवी कन्स्ट्रक्शन यांच्या सहकार्याने १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा क्रिकेट स्पर्धेला येत्या २५ जूनपासून सुरुवात होणार आहे.

ही स्पर्धा ४० षटकांची तसेच बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी १ सप्टेंबर २०११ नंतर जन्मलेले खेळाडू पात्र आहेत. या सामन्यासाठी संघातील खेळाडू जिल्हा क्रिकेट संघटनेकडे नोंदणी केलेला व सोलापूर जिल्ह्यातल्याच असला पाहिजे. इच्छुक संघांनी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राजू रंगम (9421027784) अथवा शिवा अकलूजकर (9881786578) यांच्याशी नोंदणीसाठी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *