फ्रवशी अकॅडमी मध्ये जागतिक मल्लखांब दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

नाशिक ः फ्रवशी अकॅडमी येथे जागतिक मल्लखाांब दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. फ्रावशी अकादमी येथे गेल्या १२ वर्षांपासून मल्लखांब हा खेळ विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 

जगातील मल्लखांब दिन १५ जून रोजी साजरा करण्यात येतो. परंतु, रविवार असल्यामुळे आणि दोन दिवस पाऊस असल्यामुळे १८ जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक भारतीय खेळाची वैभवशाली परंपरा असलेल्या या खेळामधील विविध प्रकारचे कौशल्य विद्यार्थ्यांनी प्रेक्षकासमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी पुरलेला पोल मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांबांची सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. 

या प्रसंगी प्रशिक्षक यशवंत जाधव यांनी या खेळाचा उगम, इतिहास, मल्लखांबचे वेगवेगळे प्रकार आणि तांत्रिक माहिती तसेच मल्लखांबचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान याची माहिती दिली. यावेळी  एक मनोरंजक नाटीकेच्या माध्यमातून खेळाचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच प्रश्नावलीच्या माध्यमातून चर्चासत्राच्या द्वारे या खेळाचे महत्त्व आणि बारकावे समजून सांगण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रतन लथ यांनी मल्लखांबमुळे विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होतेच, शिवाय  बुद्धी तल्लख होऊन अभ्यासातही फायदा होतो असे सांगून खेळाडूंचे कौतुक केले. या  कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृती, शारीरिक कौशल्य आणि बौद्धिक जागृती याचा सुंदर मिलाफ दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *