जीआयसी दुहेरी कॅरम स्पर्धेत गणेश-कुमार, विकास-पकिर अंतिम फेरीत

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

मुंबई ः जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-जीआयसी आंतर कार्यालयीन दुहेरी कॅरम स्पर्धेत गणेश चोरढेकर-कुमार आशिष आणि विकास कुमार-पकिर बशीर जोड्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

गणेश चोरढेकर-कुमार आशिष जोडीने एकमेकास पूरक खेळ केल्यामुळे सरळ जाणाऱ्या सोंगट्या अचूक घेऊनही भावना भल्ला व अभिषेक पारकर जोडीचे आव्हान २०-४ असे संपुष्टात आले आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने जीआयसी स्पोर्ट्स क्लब आयोजित दुहेरी कॅरम स्पर्धेची उपांत्य लढत जिंकली.

चर्चगेट येथील जीआयसी क्रीडा विभागामधील दुहेरी कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ४-० असा धडाकेबाज प्रारंभ करणाऱ्या ज्योती सर्वानन-शीला आजगावकर जोडीला उत्तरार्धात विकास कुमार-पकिर बशीर जोडीने अचूक फटकेबाज खेळ करीत १५-४ असे नमविले. एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात निखील केसुरने अलोक पटेलचा ४-१ असा, गणेश चोरढेकरने अंकुश कदमचा ४-३ असा, रश्मी पवारने शुभम जावळेकरचा ५-१ असा तर कुमार आशिषने अक्षय रामस्वामीचा १०-३ असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जीआयसी स्पोर्ट्स क्लबचे जॉन गायकवाड, सुरज सुवर्णा, दीक्षा जैन आदी पदाधिकारी तसेच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *