गणेश पेरे, कार्तिक पोटे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती 

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 104 Views
Spread the love

बुलढाणा ः नेपाळ येथे होणाऱया भारतीय शांती खेल महासंघ सलग्न साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धा २२ व २३ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी १४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच गणेश पेरे आणि कार्तिक पोटे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील प्रथमेश चवरे, रोहन वानखेडे, रोहन पंडित, मोहम्मद जुनेद, शेख ताबिश, कार्तिक घुबे, शेख रेहान, उत्कर्ष कदम, नंदकिशोर घुबे, संतोष खरात, फैसल पटेल, शाहरुख खान, आकाश मोरे, दीपक गोपाल हे सर्व खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व नेपालमध्ये करणार आहेत. त्यांना प्रशिक्षक म्हणून गणेश पेरे (बुलढाणा) व कार्तिक पोटे (अहिल्यानगर) यांची निवड झाली आहे.

गणेश पेरे व कार्तिक पोटे यांची भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर, एनआयएस बॉक्सिंग प्रशिक्षक मोहम्मद सोफियान, क्रीडा संयोजक दिलीप लांडकर, एनआयएस प्रशिक्षक देवानंद नेमाने, बॉक्सिंग प्रशिक्षक अस्लम हिरीवाले, खो-खो जिल्हा सचिव  कैलास करवंदे, संजय सावंत, क्रीडा मार्गदर्शक एल एस घुबे, राम कछवाल, कार्तिक पोटे, वैभव सोळंकी व शुभम सोळंकी, विष्णु पाटील घुबे आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *