
राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप
ठाणे ः भांडुप (मुंबई) येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत आर जे ठाकूर कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण ४२ पदके पटकावली. त्यामध्ये २४ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत एसजीएफआय महाराष्ट्र कराटे टीमचे कोच सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीने चमकदार यश संपादन केले. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाचा व खेळाडूंच्या मेहनतीचा हे प्रत्यक्ष पुरावा ठरले. या स्पर्धेत ठाकूर अकॅडमीने एकूण २४ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली.
या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी श्रेयश पाटील, आर्या मेंडन, पूर्वा पालकर, सिद्धी निकम, ॲलिस अल्फोन्स, युविका हेगडे, शान पाटील, सागर शिंदे, चेतन भाटी यांचे योगदान मोलाचे ठरले. या यशस्वी विजेत्या सर्व खेळाडूंना व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
पदक विजेते खेळाडू
रुद्र वाघमारे, पार्थ टोलार, रुद्र देसाई, आदित्य शिंदे, प्रतीक पवार, रुद्र जाधव, कार्तिक ठाकूर, आदित्य खरात, विवान दुबे, वेदराज काकडे, साईकेत पालांडे, आराध्य पाटील, विहान तरे, श्रेयश सरोज, ऋग्वेद शिंदे, सुयश पार्लेकर, भुवी रावत, हर्षिता गुरव, यशिका हरवटे, पुण्या शहा, ऐश्वर्या परिहार, वैष्णवी ठाकूर.