
पहिल्या रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेला थाटात प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर ः पहिल्या जिल्हास्तरीय रँकिंग टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुलात थाटात प्रारंभ झाला. आर्चिस आठवले, अध्ययन डेकाटे, आरव सांगनेरिया, वंशवर्धन बजाज यांनी आपली आगेकूच कायम ठेवली.

या स्पर्धेत झालेल्या १५ वर्षांखालील मुलांच्या क्वार्टर फायनलमध्ये अत्यंत अटीतटीचा सामना आर्चिस आठवले आणि अध्ययन डेकाटे यांच्यात झाला. त्यात आर्चिस आठवले याने ३-२ ने बाजी मारली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित नील वर्गंटवार याचा बिगरमानांकित वंशवर्धन बजाज याने अनपेक्षित ३-० ने बाजी मारली. तसेच पुरुष गटात प्रीक्वार्टर फायनल सामना अत्यंत चुरशीचा होऊन द्वितीय मानांकित रोहन मांडे याने आरव सांगनेरिया याचा ३-२ ने सनसनाटी पराभव केला.

ही स्पर्धा टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर या संघटनेतर्फे आयोजित केली आहे. बीएमएसएमएस प्रायव्हेट लिमिटेड संकाई ग्रुप यांनी प्रायोजित केली आहे. उद्घाटन प्रसंगी टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश मित्तल, सचिव विक्रम डेकाटे, खजिनदार राज जयस्वाल, तसेच कुलजीतसिंग दारोगा, प्रवीण भुजबळ, डॉ सुर्हुद अन्नछत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाचे निकाल
१५ वयोगट मुली क्वार्टर फायनल ः जनिशा शेजुळ विजयी विरुद्ध सुप्रिया पांगरे ३-०, सिद्धी जांबारे विजयी विरुद्ध आयुषी तोष्णीवाल ३-०, अहानिका डेकाटे विजयी विरुद्ध श्रुती चरखा ३-०, रावी पाटणी विजयी विरुद्ध श्रिया जांभुरे ३-०.
१५ वर्षाखालील मुले क्वार्टर फायनल रिझल्ट ः आर्चिस आठवले विजयी विरुद्ध अध्ययन डेकाटे ३-२, आरव सांगनेरिया विजयी विरुद्ध आर्यमन डेकाटे ३-१, आर्यवीर दर्डा विजयी विरुद्ध समरीत सिंग ३-०, श्लोक भारतीया विजयी विरुद्ध अर्णव मुनीश्वर ३-०.
१७ वर्षाखालील मुले क्वार्टर फायनल ः आर्चिस आठवले विजयी विरुद्ध आर्यवीर दर्डा ३-०, आरव मुनीश्वर विजयी विरुद्ध शिवांश बजोरिया ३-०, वंशवर्धन बजाज विजयी विरुद्ध नील वरगंटवार ३-०, श्लोक भारतीया विजयी विरुद्ध आर्यमन डेकाटे ३-०.
१९ वर्षाखालील मुले क्वार्टर फायनल ः आर्चीस आठवले विजयी विरुद्ध हर्षवर्धन कांबळे ३-०, वंशवर्धन बजाज विजयी विरुद्ध यश उबाळे ३-०, श्लोक भारतीया विजयी विरुद्ध आर्यवीर दर्डा ३-१.
पुरुष प्री-कॉर्टर फायनल ः आर्चीस आठवले विजयी विरुद्ध आर्यमन डेकाटे ३-०, डॉ अतुल देशमुख विजयी विरुद्ध सर्वेश ढगे ३-१, श्लोक भारतीया विजयी विरुद्ध सुखविंदर सिंग ३-०, नील शाह विजयी विरुद्ध हर्षवर्धन कांबळे ३-०, मनोज कानोडजे विजयी विरुद्ध आर्यवीर दर्डा ३-०, श्रीपाद जोशी विजयी विरुद्ध वंशवर्धन बजाज ३-०, संजीव गायकवाड विजयी विरुद्ध नील वरगंटवार ३-०, रोहन मांडे विजयी विरुद्ध आरव सांगनेरिया ३-२.