
धाराशिव ः २१ जून हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ११वा जागतिक योग दिन क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेजमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
योग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व योग ही एक शिस्त आहे, जी शारीरिक मुद्रा श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान आणि नैतिक तत्वे एकत्र करते. मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्यात योगाचे सार आहे. लवचिकता, मुद्रा सुधारणे आणि सामर्थ्य वाढविण्याच्या क्षमतेद्वारे जीवनातील योगाचे महत्व प्रा बापू बराते यांनी सांगितले.
योग दिन साजरा करतेवेळी कुलदीप सावंत, प्रा राहुल सिरसाट, प्रवीण साळुंखे, पवन नाईकल, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.