
नागपूर ः श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
योग दिनानिमित्त सगळ्यांचा योगाभ्यास झाला. त्यामध्ये आसन, प्राणायाम, ओमकार, ध्यान, बंध, मुद्रा इत्यादी सर्व प्रकार करण्यात आले क्रीडा विभाग प्रमुख प्रा डॉ संजय खळतकर यांचे सहकार्य तर संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ जगदीश वाटमोडे यांनी आभार मानले.