
छत्रपती संभाजीनगर ः २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजीनगर मार्फत बीबी-का-मकबरा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी खासदार डॉ भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पुरातत्व विभाग अधिकारी भागवत, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी खासदार डॉ भागवत कराड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना योगा ही आपली प्राचीन संस्कृती असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी देशाला दिलेल्या संदेशाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. योगसाधक यांच्यामार्फत आयुष मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉल नुसार योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासाचा लाभ जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय कार्यालये, क्रीडा संघटना, योग संघटना, शाळा/महाविद्यालये, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, योग साधक, नागरीक त्यांनी केला.
या प्रसंगी या इस्कॉन कंपनीने ५०० योग साधकांना मोफत खिचडी वाटप केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी-कर्मचारी, पुरातत्व विभाग अधिकारी कर्मचारी, क्रीडा उपसंचालक विभागीय कार्यालय व क्रीडा अधिकारी कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले.