जालना : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथील क्रिकेट टर्फ मैदानावर जागतिक योग दिनानिमित्त योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणीयार, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र गाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारी आणि डॉ नारायण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
योग गुरु मनोज लोणकर यांच्यासह सुनीता माटोळे व ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करुन घेतली. योग दिनाचे यशस्वी आयोजन करणेकरिता जिल्हास्तर योग समिती, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद, जालना, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना जालना, सार्वजनिक आरोग्य़ विभाग, जिल्हा परिषद, जालना, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, विविध योग संघटना, जिल्हा स्काऊट गाईड, तंत्र निकेतन महाविद्यालय व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, विविध क्रीडा मंडळे यांचे सहकार्य लाभले.
योग प्रात्यक्षिकांकरिता जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, श्री सरस्वती भुवन प्रशाला, ऑक्सफर्ड हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल, संस्कार प्रबोधिनी, ज्ञानज्योत हायस्कूल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाचे ५५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी लता लोंढे व आरती चिल्लारे, सिध्दार्थ कदम, संतोष प्रसाद, अमोल मुसळे, राहुल गायके, हरुन खान, जयश्री चंदनशिव यांनी विशेष परिश्रम घेतले.