सोहम इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 22, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः सातारा परिसरातील सोहम इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि योगा ट्रेनर डॉ माया काळे व त्यांचे सहकारी पूजा पवार यांनी शाळेमध्ये योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवून मुलांकडून योगा करून घेतले. शाळेच्या अध्यक्ष सुवर्णा आव्हाळे यांनी त्यांचे मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच पालकांनीही या योग दिनानिमित्त मोठा उत्साह दाखवला.

लहान मुलांनी आपले आरोग्य, आपला आहार आणि आपल्या जीवनात योग किती महत्त्वाचा आहे याचे मुलांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले ‘रोज कराल योग तर मन आणि शरीर दोन्हीही तंदुरुस्त राहतें. असा संदेश त्यांनी दिला आणि मुलांचा अभ्यास सुद्धा छान होऊन तो परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतो आणि आपला आत्मविश्वास वाढू शकतो असे सांगितले.

या कार्यक्रमानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक प्रा प्रवीण आव्हाळे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन उप मुख्याध्यापक प्रवीण राऊत व भारती बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा नरवडे यांनी केले. प्रीती वायकोस व अश्विनी बोजवारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *