विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये योगदिन उत्साहात साजरा 

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः बजाजनगर परिसरातील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे राजू तुकाराम नवले, देविदास बाबुराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, शाळेचे डायरेक्टर अजगर बेग, संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

 योग विषयावर संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांनी मार्गदर्शन केले. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आजच्या काळात योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे परिणाम वैद्यकीय दृष्टीकोनातून अभ्यासले जात आहेत. योगाचा उपयोग रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, मानसिक ताण यावर होणारा परिणाम संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांमध्ये योगाद्वारे लवचिकता, सहनशीलता, मनःशांती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, डायरेक्टर अजगर बेग व ईश्रत बेग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे, निशिगंधा तायडे, स्नेहल पाटील, ज्योती कापसे, शुभांगी बाविस्कर, कविता काटापल्ले, आरती डहाळे, शितल खैरनार, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कवडे, मयुरी वानखडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी, पूजा कवडे, अर्चना पांडे, अनुजा वैद्य, मेघा सुरडकर, व्यंकटेश वैष्णव, श्याम जाधव व शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा कैलास जाधव व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *