शिवांश, श्लोक, रुद्र, आराध्या, अविनाश, आरोही, स्वरा, आराध्य चॅम्पियन

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 301 Views
Spread the love

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा 

छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शिवांश लहाने, श्लोक मोठे, रुद्र आव्हाड, आराध्या आरमार, अविनाश शिरसाट, आरोही नलावडे, स्वरा शेळके, आराध्य चव्हाण आणि स्वरा वानखेडे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. 

 जिल्हा क्रीडा कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून अंडर १०, अंडर १२ जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन तलवारबाजी हॉल, विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. 

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ जॉन जिल्हादुराई, राज्य संघटनेचे सचिव डॉ उदय डोंगरे, डॉ दिनेश वंजारे, सागर मगरे, क्रीडा मार्गदर्शक तुषार आहेर, शिल्पा नेने, अजय त्रिभुवन आदींची उपस्थिती होती.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून जयदीप पांढरे, अभिजीत बोर्डे, गार्गी डोंगरे, कार्तिक चटप, सिद्धार्थ विधाते, वैष्णवी राऊत आदींनी काम पाहिले.

स्पर्धेचा अंतिम निकाल 

अंडर १० फॉइल प्रकार ः १. शिवांश लहाने, २. अभेद्य देशमुख, ३. आरुष पोपळे. 

अंडर १० इप्पी प्रकार ः १. श्लोक मुठे, २. विरेन जाधव, ३. विवान बलांडे, ४. सूर्यतेज देशमुख. 

अंडर १० सेबर प्रकार ः १. रुद्र आहेवाड, २. आरोह जाधव, ३. स्वराज निळ, ४. शिव निळ.

अंडर १० इप्पी प्रकार ः १. आरध्या अरमाळ.

अंडर १२ फॉइल प्रकार ः १. अवनीश शिरसाट, २. रजत लोळगे, ३. श्रीपाद राऊत, ४. वेदांत राजपुरे. 

अंडर १२ इप्पी प्रकार ः १. आरोह नलावडे, २. आरुष मालोदे, ३.  श्रीराज जाधव, ४. हर्षल खमाट. 

अंडर १२ फॉइल प्रकार ः १. स्वरा शेळके.

अंडर १२ इप्पी प्रकार ः १. आराध्या चव्हाण, २. मोहिनी फेगडे, ३. स्वरा खैरनार, ४. राजनंदिनी आवटे. 

अंडर १२ सेबर प्रकार ः १. स्वरा वानखेडे, २. सई ताडे, ३. भूमी सोनोने, ४. अनघा वरपडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *