सोलापूर येथे खो-खो पंच परीक्षेचे आयोजन

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या वतीने जिल्हा खो-खो पंच परीक्षा गुरुवारी (२६ जून) दुपारी ३ वाजता विजापूर रोडवरील जिल्हा परिषद शाळा एसआरपी कॅम्प शाळेत होईल.

मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर यांच्या सहकार्याने ही परीक्षा आयोजित केली आहे. जिल्हा पंच परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थी राज्य पंच परीक्षेस पात्र ठरतील. जिल्हा पंच परीक्षा पूर्वी राज्य परीक्षेसाठी इच्छुक परीक्षार्थींना यावेळी राष्ट्रीय व राज्य पंचाचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे राज्य इच्छुक परीक्षार्थीनी यावेळी उपस्थित राहावे.

राज्य पंच परीक्षा हरिभाई देवकरण प्रशाला येथे उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या सहकार्याने रविवारी (२९ जून) सकाळी १० वाजता होईल. जिल्हा परीक्षा शुल्क ३०० व राज्य परीक्षा शुल्क १५०० रुपये राहील. इच्छुक पंचांनी परीक्षा शुल्कासह (९८८११३३१०३) नोंदणी करावी, असे आवाहन सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सरचिटणीस ए बी संगवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *