महाराष्ट्रात बॉक्सिंग संघटना, खेळाडू यांच्या विभागीय बैठका

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

२५ जून ते ६ जुलै या कालावधीत आयोजन

चंद्रपूर ः बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या इंटरिम कमिटीमार्फत महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेवर ऍड-हॉक कमिटी नेमण्यात आलेली आहे. सदर कमिटीला संबंधित कार्यभार बीएफआय इंटरिम कमिटीमार्फत लेखी स्वरूपात सोपविण्यात आलेला आहे.

बीएफआयने महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेला निवडणूक प्रक्रियेसाठी ३ महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे ऍड-हॉक कमिटीमार्फत विभागनिहाय बैठकांचे आयोजन करून निवडणूक प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.

ही निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची असून सर्वांनी वेळेवर व ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना ऍड-हॉक कमिटी संयोजक व सदस्य राकेश तिवारी यांनी केले आहे.

यासंदर्भात, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील बॉक्सिंगसाठी कार्यरत व्यक्ती, व्यक्ती समूह, संस्था यांनी खालील सूचना लक्षात घेऊन कृती करावी.

  • संबंधित व्यक्तींनी किंवा संस्थांनी बॉक्सिंग क्षेत्रात केलेल्या कार्याचे पुरावे (कागदपत्रे) बरोबर आणावेत.
  • उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाने सर्व ओरिजिनल कागदपत्रे व एक सेल्फ-अटेस्टेड झेरॉक्स सेट सोबत आणणे बंधनकारक आहे.
  • ही सर्व कागदपत्रे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या इंटरिम कमिटीला पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
  • संबंधित बैठकांना अनुपस्थित राहिल्यास, त्या व्यक्तीस पुढील कोणत्याही निर्णयात सहभागी होण्यासाठी विचार करण्यात येणार नाही. तसेच, भविष्यात कोणतीही तक्रार स्वीकारण्यात येणार नाही.

विभागनिहाय बैठकांचे वेळापत्रक

१. नागपूर विभाग
२५ जून २०२५
वेळ : सकाळी १० ते दुपारी १
स्थळ : रविभवन, सिव्हिल लाईन्स, हायकोर्ट जवळ, नागपूर.

२. मुंबई विभाग
२६ जून २०२५
वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर (प.) मुंबई.

३. पुणे विभाग
२७ जून २०२५
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ : बालेवाडी, बी विंग होस्टेल.

४. कोल्हापूर विभाग
२८ जून २०२५
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ : विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर.

५. लातूर विभाग
२९ जून २०२५
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ : विभागीय क्रीडा संकुल, लातूर.

६. नाशिक विभाग
४ जुलै २०२५
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ : एकलव्य क्रीडा संकुल, एम जे कॉलेज, जळगाव.

छत्रपती संभाजीनगर विभाग
५ जुलै २०२५
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ : हॉटेल अरोमा इन, समर्थनगर, सीसीडी समोर, छत्रपती संभाजीनगर.

अमरावती विभाग
६ जुलै २०२५
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ: विभागीय क्रीडा संकुल, अमरावती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *