
मनोज कानोडजे, रावी पाटणी, अध्ययन डेकाटे यांना दुहेरी मुकुट
छत्रपती संभाजीनगर ः टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत अर्चिस आठवले याने चार गटात विजेतेपद पटकावले. मनोज कानोडजे, रावी पाटणी आणि अध्ययन डेकाटे यांनी आपापल्या गटात दुहेरी मुकुट संपादन केला.
विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एमएसएमएस प्रायव्हेट लिमिटेड आणि संगकाज ग्रुप यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख अतिथी बीएमएसएमएस कंपनीचे चेअमरन गिरिधर सांगानेरिया, संगकाज ग्रुपचे डायरेक्टर अनुप्रास बजाज आणि लोकमत ग्रुपचे एमडी करण दर्डा यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. खजिनदार राज जयस्वाल यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ वाघ यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमास कुलजीत सिंग दरोगा, टेबल टेनिस स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश मित्तल यांची उपस्थिती होती. सचिव विक्रम डेकाटे यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
११ वर्षांखालील मुले ः १. अध्ययन डेकाटे, २. अभयसिंग राजपूत.
११ वर्षांखालील मुली ः १. जिया बाहेती, २. सावी अनासपुरे.
१३ वर्षांखालील मुले ः १. अध्ययन डेकाटे, २. जयवर्धन बजाज.
१३ वर्षांखालील मुली ः १. रावी पाटणी, २. अहानिका डेकाटे.
१५ वर्षांखालील मुले ः १. अर्चिस आठवले, २. श्लोक भारतीया.
१५ वर्षांखालील मुली ः १. रावी पाटणी, २. सिद्धी जांबुरे.
१७ वर्षांखालील मुले ः १. अर्चिस आठवले, २. वंशवर्धन बजाज.
१७ वर्षांखालील मुली ः १. देवांशी तोष्णीवाल, २. सृष्टी राजूरकर.
१९ वर्षांखालील मुले ः १. अर्चिस आठवले, २. आरव सांगानेरिया.
३९ प्लस वयोगट ः १. श्रीपाद जोशी, २. संजीव गायकवाड.
४९ प्लस वयोगट ः १. प्रकाश दाभाडे, २. देवेंद्र नाथ.
५९ प्लस वयोगट ः १. भाऊसाहेब घनवट, २. रवींद्र साळुंके.
पुरुष दुहेरी ः १. मनोज कानोडजे-अर्चिस आठवले, २. श्रीपाद जोशी-भाऊसाहेब घनवट.
पुरुष एकेरी ः १. मनोज कानोडजे, २. अर्चिस आठवले.
महिला एकेरी ः १. दिव्यांशी तोष्णीवाल, २. मनीषा काळे.