शिक्षण मंत्री दादा भुसे यांची जालना क्रीडा प्रबोधिनीला भेट 

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

खेळाडू,  पालकांशी संवाद, निधी कमी पडू दिला जाणार नाही – भुसे 

जालना ः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जालना शहरातील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीला  भेट दिली आणि क्रीडा प्रबोधिनीच्या आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती घेतली.

क्रीडा प्रबोधिनी येथील मुलांनी आतापर्यंत मिळवलेले सर्व चषक यांची  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली. त्याचबरोबर क्रीडा प्रबोधिनी येथील विद्यार्थ्यांसोबत तसेच पालकांसोबत संवाद साधला. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

क्रीडा प्रबोधिनीची आजपर्यंतची वाटचाल कशी झाली व त्याच्यासाठी निधी कुठून जमा केला याची सर्व माहिती घेतली व त्यांना जेव्हा सांगण्यात आले की ही प्रबोधिनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुलांसाठी चालवलेली एक आगळीवेगळी क्रीडा प्रबोधिनी आहे हे ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. इथून पुढे क्रीडा प्रबोधिनी क्रीडा प्रबोधिनीची वाटचाल निर्विवादपणे चालण्यासाठी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली आणि वेगळे लेखा शीर्षक तयार करून निधी देण्याचे मंत्री दादा भुसे यांनी मान्य केले. 

या प्रसंगी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, शिक्षण उपसंचालक मुकुंद साहेब, सहाय्यक संचालक सतीश सातव, शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळू खरात, शिक्षणाधिकारी प्राथमिक सानप, शिवसेनेचे भाऊसाहेब घुगे, पंडित दादा भुतेकर, शैलेश घुमारे, उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे, विनय वडजे, सुभाष भालेराव, शिक्षक संघटनेचे अरुण जाधव, रवींद्र काकडे, प्रभाकर शिंदे, सुनील मावकर, प्रमोद खरात, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर व क्रीडा प्रबोधिनीचा संपूर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *